मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी अयोध्या दौऱ्यावर करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. महाविकासआघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करणार असल्याचे याआधीच सांगण्यात आले होते.
संजय राऊत म्हणाले कि, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी अयोध्येला जातील. याठिकाणी रामल्लाचे दर्शन घेऊन शरयू तीरावर आरती करतील, असे कार्यक्रमाचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच अयोध्या दौऱ्याकडे कोणीही राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. हा आमचा श्रद्धेचा विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Sanjay Raut, Shiv Sena: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray will visit Ayodhya (Uttar Pradesh) on 7th March. pic.twitter.com/v7wHTHJM27
— ANI (@ANI) January 25, 2020
दरम्यान, संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना सोबत घेऊन आम्ही अयोध्येला जाणार आहोत तसेच आम्ही काँग्रेसला सुद्धा सोबत येण्यासाठी आवाहन करत असल्याचे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हंटले होते.
सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पुर्ण करणारच!
प्रभू श्रीरामाची कृपा.
सरकारला शंभर दिवस पुर्ण होताच मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे अयोध्येस जातील .श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2020