Uddhav Thackeray meets Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज 84 वा वाढदिवस. यानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्वांमध्ये राजकीय वर्तुळातूनही शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे. त्यातच शिवसेना प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आज वाढदिवस आहे. दरम्यान, आज शरद पवार हे नागपूरमध्ये आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यातच आज उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटी दरम्यान,उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरच्या हॅाटेल प्राईडमध्ये भेट घेतली. उद्धव ठाकरेंसोबत यावेळी संजय राऊत, आदित्य ठाकरे हे देखील शुभेच्छ देण्यासाठी उपस्थित होते.
दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांमुळे शरद पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.