Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या कामाबाबत अथवा वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र इतर कलाकारांप्रमाणे सोनालीला देखील सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र अनेकदा ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना देखील दिसते. नुकतेच सोनाली इनस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. ज्यात सोनालीच्या चाहतीने तिला एक सल्ला दिला. यावर सोनालीने देखील चोख उत्तर दिले आहे.
सोनाली कुलकर्णीने तिचे काही दुबईतले फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सोनाली जांभळ्या रंगाच्या साडीत दिसतं आहे. हे फोटो शेअर करत सोनालीने लिहिलं आहे, ”Being वेरी मच इंडियन in #dubai” सोनालीचे हे फोटो अनेकांच्या पसंतीस पडले. सध्या तिच्या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. पण सोनालीच्या एका चाहतीने तिला चांगला सल्ला दिला आहे. सोनालीची चाहती म्हणाली, ‘काही पण कर बिग बॉसमध्ये नवऱ्याबरोबर जाऊ नकोस.’
View this post on Instagram
यावर सोनाली म्हणाली की, ‘एकटी पण जाणार नाही कधीच.’ सोनाली दिलेले हे उत्तर अनेकांना आवडले आहे. दरम्यान, छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ नेहमीच चर्चेत असतो. सध्या ‘बिग बॉस’चं 17′ वं पर्व चालू झाले असून यात पहिल्यांदाच काही कपल्स स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. अंकीता लोखंडे आणि तीचा पती विकी जैन यांच्यात या शोमध्ये सतत भांडण होत असल्याचे दिसत आहे. यावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले.