Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीदरम्यान ‘मी पुन्हा येईन’ या त्यांच्या वक्तव्याविषयी भाष्य केले. मी पुन्हा येईन हे केवळ वाक्य नव्हतं, त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं.. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी पुन्हा येईन हे वाक्य नव्हतं. त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं. लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण, ( Uddhav Thackeray On Devendra Fadnavis )
उध्दव जी यांनी स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं. नव्हतो आलो तेव्हा टीका झाली, हे हीत राहतं. पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो.” असं फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, आता फडणवीसांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी ते हिंगोलीतल्या सभेत बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, “काही लोकांना अभिमान कसला असतो? की आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. अरे घडफोडे तुम्ही. यांना घरफोडीचं लायसन्स देऊन टाका. हे घडफोडे आहेत.
तुमचं चिन्ह कमळ नको, त्यापेक्षा हातोडी वगैरे ठेवा. कारण तुमच्या पक्षांत ना नेते तयार झाले, आदर्श तयार झाले नाहीत. नेत्यांचा आदर्श सोडाच आदर्शवाले नेते त्यांनी घेतले. कारण विचार किंवा काही शिल्लकच नाही. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यात निरीक्षण नोंदवलं आहे.
राष्ट्रवादीच्या बाबतीत.. शरद पवारांसारखा माणूस संपूर्ण राज्य पिंजून काढतो आहे. त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्या पक्षाचं नाव चोरता आणि फोटोही चोरता? इतकी बेशरम अवलाद कधी महाराष्ट्रात पाहिली नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
भाजपा म्हणजे अधिकृतरित्या खंडणी गोळा करणारी टोळी झाली आहे. निवडणूक रोख्यांचा इतका हातोडा पडला आहे. पण निर्ल्लजं सदासुखी अशी ही अवस्था आहे. माझ्या वडिलांचा म्हणजेच बाळासाहेबांचा फोटो लावण्यापेक्षा ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचे फोटो दाखवा असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ( Uddhav Thackeray On Devendra Fadnavis )