Womens Premier League 2024 Delhi Capitals Prize Money : महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) चे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून आरसीबीने यंदा पहिल्यादाच विजेतेपद पटकावले.
बंगळुरूसाठी अंतिम सामना खूपच सोपा होता, कारण त्यांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला केवळ 113 धावांवर रोखले आणि प्रत्युत्तरात 19.3 षटकांत दोन गडी गमावून सहज हे लक्ष्य गाठले. चला तर मग जाणून घेऊया की, दिल्ली कॅपिटल्स हरूनही करोडपती कशी झाली आणि चॅम्पियन आरसीबीला किती बक्षीस रक्कम मिळाली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्रात चॅम्पियन ठरलेल्या संघासाठी 6 कोटी रुपये आणि उपविजेत्या संघासाठी 3 कोटी रुपये बक्षीस रक्कम निश्चित केली होती. दुसऱ्या सत्रात म्हणजेच 2024 मध्ये या बक्षीस रकमेत कोणताही बदल झालेला नाही.
Runners-up. But here’s to our roaring spirit that’ll always stand tall 💙❤️#YehHaiNayiDilli #TATAWPL pic.twitter.com/NqgxjACna6
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 17, 2024
दिल्लीचा संघ दुसऱ्यांदाही उपविजेता…
अशा परिस्थितीत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बक्षीस रक्कम म्हणून 6 कोटी रुपये आणि उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला 3 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. पहिल्या सत्रात जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सलाही सहा कोटी रुपये मिळाले होते.
WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
पहिल्या सत्राप्रमाणेच दिल्लीचा संघ दुसऱ्यांदाही उपविजेता राहिला. दोन्ही हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ जेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर राहिली.