मुंबई – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ते मागील दहा दिवसांपासून विलगीकरणात आहेत.
उदय सामंत म्हणाले कि, गेले दहा दिवस स्वतः विलगीकरणात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले10 दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत असून पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट+ve आला आहे.मी गेले10दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2020
दरम्यान, २४ सप्टेंबरला राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. तर शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला होता.