मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. दरम्यान, तारक मेहता मालिकेतील आणखील एक लोकप्रिय पात्र म्हणजे ‘दयाबेन’ अभिनेत्री दिशा वकानीने ही महत्वाची भूमिका साकारली आहे.
पण गेल्या काही वर्षापासून दिशा वकानी या मालिकेतून गायब झाली आहे. सप्टेंबर 2017 मध्ये तिने प्रसूती रजा घेतली. चाहते तिला मालिकेत पुन्हा पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दिशा वकानी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये लवकरच कमबॅक करणार आहे.
नवरात्री किंवा दिवाळीच्या आधी दिशा वकानी म्हणजेच दयाबेन मालिकेत कमबॅक करणार आहे. दयाबेनची गरबा खेळण्याची स्टाईल ही खूप प्रसिद्ध आहे आणि दयाबेनला गरबा खेळायला खूप आवडतो. त्यामुळे नवरात्रीमध्ये दयाबेनचे मालिकेत होणारे कमबॅक हे योग्य ठरले. असे मालिकेच्या निर्मात्यांना वाटते. दरम्यान, जर दिशा वकानी मालिकेत परतली नाही तर दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली जाऊ शकते.
दरम्यान, नुकतंच तारक मेहता का उल्टा चष्माने मालिकेचे 3000 भाग पूर्ण केले. ही मालिका कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करते आहे. या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे.