U19 World Cup 2024, India U19 vs South Africa Live Score : आज अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट आहे. या संपूर्ण स्पर्धेत हा संघ अपराजित असून मागील सलग पाच सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 245 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 7 गडी गमावून 244 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने 46 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. यानंतर लाहुआन ड्रे प्रिटोरियसने रिचर्ड सेलेटस्वेनच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली.
Innings Break!
South Africa U19 post 244/7 in the first innings.
Raj Limbani, the pick of the #TeamIndia bowlers with figures of 3/60 👌👌
Over to our batters 🙌
Scorecard ▶️ https://t.co/Ay8YmV8iNI#BoysInBlue | #U19WorldCup | #INDvSA pic.twitter.com/APCOViKai5
— BCCI (@BCCI) February 6, 2024
प्रिटोरियसने 102 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. त्यानंतर ऑलिव्हर व्हाईटहेडने 22 धावा, डेव्हन मरायसने 3आणि कर्णधार युआन जेम्सने 24 धावा केल्या. रिचर्डने एका बाजू संभाळताना अर्धशतक झळकावले. तो 100 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 64 धावा करून बाद झाला. रिले नॉर्टन सात धावा करून नाबाद राहिला आणि ट्रिस्टन लुस 12 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 23 धावा करून नाबाद राहिला.
IND vs ENG : आर. अश्विनने रचला इतिहास, ‘विशाखापट्टणम’मध्ये मोडला 45 वर्षे जुना विक्रम…
भारताकडून गोलंदाजीत राज लिंबानी याने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर मुशीर खानने दोन विकेट घेतल्या. नमन तिवारी आणि सौमी पांडे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.