Stock Market Closing Bell: जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे आज मंगळवार (दि. 6) देशांतर्गत बाजारात खरेदीचे वातावरण दिसून आले. आयटी शेअर्सनी आज बाजाराला मजबूत आधार दिला आणि इक्विटी बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 वाढीसह बंद झाले. इंट्रा-डेमध्ये सेन्सेक्सने 72250 तर निफ्टीने 21950 चा टप्पा ओलांडला होता. बाजारातील या तेजीमुळे आज बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 4.36 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे, म्हणजेच गुंतवणूकदारांचे भांडवल 4.36 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.
दिवसअखेर सेन्सेक्स 454.67 अंकांच्या किंवा 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 72186.09 वर बंद झाला आणि निफ्टी 157.70 अंकांच्या किंवा 0.72 टक्क्यांच्या वाढीसह 21929.40 वर बंद झाला. आज निफ्टीचा आयटी निर्देशांक सुमारे 3 टक्क्यांनी मजबूत झाला आहे, तर तेल आणि वायू देखील 2.5 टक्क्यांहून अधिक मजबूत झाला आहे. ऑटो आणि फार्मा प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. बँक निफ्टी 0.29 टक्क्यांनी घसरला.
गुंतवणूकदारांनी 4.36 लाख कोटी रुपये कमावले –
एक ट्रेडिंग दिवस आधी म्हणजे 5 फेब्रुवारी 2024 रोजी, BSE वर सूचीबद्ध सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 382.61 लाख कोटी रुपये होते. आज म्हणजेच 6 फेब्रुवारी 2024 रोजी ते 386.97 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात सुमारे 4.36 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे 19 शेअर हिरव्या रंगात –
सेन्सेक्सवर 30 शेअर्स सूचीबद्ध आहेत, त्यापैकी आज फक्त 19 ग्रीन झोनमध्ये बंद झाले. आज सर्वाधिक वाढ एचसीएल, टीसीएस आणि मारुतीमध्ये झाली. दुसरीकडे, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक आणि आयटीसीमध्ये आज सर्वात मोठी घसरण झाली.
BSE सेन्सेक्सच्या 30 समभागांची स्थिती –
निफ्टीचे टॉप गेनर्स आणि टॉप लॉजर्स शेअर्स –