PAK vs AUS U19 World Cup 2024 Semi Final 2 Match : बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे सुरू असलेल्या अंडर-19 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉम स्ट्रेकरच्या विध्वंसक गोलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 48.5 षटकांत 179 धावाच करू शकला. टॉम स्ट्राकेरने 9.5 षटकात 24 धावा देत 6 बळी घेतले. यादरम्यान त्यानं एक षटक निर्धाव टाकले. त्यांच्याशिवाय माही बियर्डमन, कॅलम विडलर, राफे मॅकमिलन आणि टॉम कॅम्पबेल यांनीही प्रत्येकी 1 बळी घेतला.
पाकिस्तानकडून अझान अवेस आणि अराफत मिन्हास या दोघांनी प्रत्येकी 52-52 धावा केल्या. या दोघांशिवाय पाकिस्तानकडून केवळ शमिल हुसेन दुहेरी आकडा पार करू शकला. त्याने 23 चेंडूत 3 चौकारासह 17 धावा केल्या. पाकिस्तानकडून एकही षटकार मारला गेला नाही.
Tom Straker finishes with an incredible 6-24 in the #U19WorldCup semi-final against Pakistan! 👏
The Aussies need 180 for a spot in the Final against India
— cricket.com.au (@cricketcomau) February 8, 2024
विलोमूर पार्क, बेनोनी येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारू गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत कर्णधाराचा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवला. त्यांनी पाकिस्तान संघाला 200 धावांचा टप्पाही ओलांडू दिला नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सामन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपली पकड कायम ठेवली.
#U19WorldCup2024 #INDvPAK : तर 18 वर्षांनंतर पुन्हा विजेतेपदासाठी होऊ शकतो महामुकाबला…
टीम इंडियाने पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आजचा विजयी संघ रविवारी, 11 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना खेळेल. आता भारत-पाकिस्तान फायनल होते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.