#U19WorldCup : कैफपासून ते कोहलीपर्यंत, ‘या’ 5 कर्णधारांनी भारताला जिंकून दिलंय अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद…

Updated On:-6 फोटो
Photo 1
1 / 6

आणखी संबंधित फोटो

U19 World Cup Wining Indian Captains : अंडर-19 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. पाचवेळा अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणारी टीम इंडिया सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने आज मैदानात उतरणार आहे. पण त्याआधी, कोणत्या कर्णधारांनी भारताला अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले ते जाणून घेऊया.

1- मोहम्मद कैफ (2000)

टीम इंडियाने 2000 मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली अंडर-19 विश्वचषकाचे पहिले विजेतेपद पटकावले होते. कैफच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजेतेपदाच्या लढतीत श्रीलंकेचा 6 विकेटने पराभव केला होता.

2- विराट कोहली (2008)

अंडर-19 विश्वचषकाच्या दुसऱ्या विजेतेपदासाठी भारताला काही काळ वाट पाहावी लागली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2008 मध्ये मेन इन ब्लूला अंडर-19 चॅम्पियन बनवले. भारताने विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ट्रॉफी जिंकली.

3- उन्मुक्त चंद (2012)

उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने 2012 मध्ये अंडर-19 विश्वचषकाचे तिसरे विजेतेपद पटकावले होते. उन्मुक्तही विराट कोहलीप्रमाणेच दिल्लीचा होता. उन्मुक्तच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

4- पृथ्वी शॉ (2018)

2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने 19 वर्षाखालील विश्वचषकाचे चौथे विजेतेपद पटकावले. शॉच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ट्रॉफी जिंकली होती.

5- यश धुल (2022)

यश धुलने त्याच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये भारतासाठी अंडर-19 विश्वचषकाचे पाचवे विजेतेपद पटकावले होते. धुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडचा 4 विकेट्स राखून पराभव करत फायनल जिंकली. विशेष धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत एकही सामना न गमावता विश्वविजेतेपद पटकावले होते.

आणखी संबंधित बातम्या

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

Cricketers GPS Device : भारतीय क्रिकेटपटूच्या पाठीवर दिसणारं 'हे' काळ्या रंगाच उपकरण नक्की काय असतं अन् सामन्यात का वापरतात?

Cricketers GPS Device : भारतीय क्रिकेटपटूच्या पाठीवर दिसणारं 'हे' काळ्या रंगाच उपकरण नक्की काय असतं अन् सामन्यात का वापरतात?