दुबई – आयसीसीने १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सातत्याने वर्चस्व राखलेल्या भारतीय संघाचा सलामीचा सामना बांगलादेशशी होणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी १९ जानोवारी ते ११ फुब्रुवारी या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत होणार आहे.
या स्पर्धेत एकूण ४१ सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ २० जानेवारीपासून बांगलादेशविरुद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या स्पर्धेत आयसीसीने चार गटात सर्व संघांना विभागले आहे. प्रत्येक संघ आपल्या गटातील तीनही संघांशी सामना खेळेल. चारही गटांतील पहिले तीन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. या फेरीत प्रत्येक संघ अन्य दोन संघांशी लढत खेळेल. यातील पहीले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. या स्पर्धेसाठी उपांत्य लढती व अंतिम लढतीसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. साखळी फेरीत २० जानेवारीला भारताचा बांगलादेशशी सामना झाल्यावर २५ जानेवारीला आयर्लंडशी तर तिसरा सामना २८ जानेवारीला अमेरिकेशी होणार आहे.
BCCI : पिंकबॉल टेस्टला भारताचा नकार; जय शाह यांनी सांगितले कारण…
या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार असून भारतासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या संघांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. उर्वरित पाच संघ विभागीय पात्रता फेरीत निश्चित झाले. त्यात नामिबिया, न्यूझीलंड, नेपाळ, स्कॉटलंड आणि अमेरिका यांना पात्रता मिळाली. या स्पर्धेवर बारतीय संघाने सातत्याने वर्चस्व राखले आहे. १९८८ सालापासून ही स्पर्धा सुरु झाली. तर १९९८ सालापासून दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते. आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ व २०२२ असे पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर २०१६ व २०२० साली भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
स्पर्धेची गटवारी
अ गट – भारत, बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका
ब गट – इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड
क गट – ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया
ड गट – अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड, नेपाळ