ICC Test Rankings : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना (Ind vs Eng) रांची येथे खेळला गेला. या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव केला. हा सामना जिंकून भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
नुकतेच आयसीसीने रांची कसोटीनंतर टेस्ट रँकिंग जाहीर केले. कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. चौथ्या कसोटीत भारताच्या विजयाचा हिरो ठरलेल्या यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांना क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. तर कर्णधार रोहित शर्माला मात्र तोटा सहन करावा लागला. | ICC Test Rankings
भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेत चर्चेत आला आहे. यशस्वी तीन स्थानांनी झेप घेत कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम १२ व्या स्थानावर पोहोचला आहे.
यशस्वीने रोहित शर्माला मागे सोडले. रोहित एका जागेने मागे पडला आहे. कर्णधार रोहितची 13 व्या स्थानावर घसरण झाली आहे. यशस्वीने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये 655 धावा केल्या आहेत. त्याचा फॉर्म असाच कायम राहीला तर लवकरच यशस्वीचा टॉप 10 यादीत समावेश होईल. | ICC Test Rankings
कसोटी क्रमवारीत ध्रुवची मोठी उडी
विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलने रांची कसोटीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने 90 आणि 39 धावा केल्या. या कामगिरीनंतर ध्रुवने 31 स्थानांनी झेप घेत 69 वे स्थान गाठले. त्याचवेळी, इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉलीने चौथ्या कसोटीच्या दोन डावात 42 आणि 60 धावा केल्या आणि कसोटी क्रमवारीत टॉप 20 मध्ये प्रवेश केला.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने 122 धावांची तुफानी खेळी केली. यानंतर त्याने टॉप 3 मध्ये स्थान मिळवले. याशिवाय आर अश्विनने चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या आणि गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत तो २१ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. कुलदीप यादव 10 स्थानांची झेप घेत 32 व्या स्थानावर पोहोचले आहे.
ICC Test Rankings