Day-Night or Pink Ball Test Match in India : तुम्हाला डे-नाईट किंवा पिंक बॉल टेस्ट मॅच बघायला आवडते का? जर तुम्ही भारतीय कसोटी क्रिकेटचे चाहते असाल आणि गुलाबी रंगाच्या चेंडूंसह रात्रीचे कसोटी सामने बघायला आवडत असेल, तर ही बातमी ऐकून तुमची निराशा होईल.
वास्तविक, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ला गुलाबी चेंडू कसोटी म्हणजेच दिवस आणि रात्री होणार्या कसोटी सामन्यांचे आयोजन करायचे नाही. या कारणास्तव, BCCI ने भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटच्या या देशांतर्गत हंगामात गुलाबी चेंडूचा एकही कसोटी सामना नियोजित केलेला नाही.
जय शहा यांनी सांगितले कारण…
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतात गुलाबी चेंडूचा कसोटी सामना आयोजित न करण्यामागचे कारण स्पष्ट करताना म्हटले आहे की, ते अशा सामन्यांच्या बाजूने नाहीत कारण असे सामने केवळ 2-3 दिवसांत संपतात. आणि चाहत्यांना ते पाहण्यात रस नाही. पुढे ते म्हणाले की, आम्हाला गुलाबी चेंडूचा कसोटी सामना पाहण्याची चाहत्यांची आवड वाढवायची आहे. चाहत्यांना अशा सामन्यांची सवय झाली की आम्ही दिवस-रात्र कसोटी सामने आयोजित करू.
बीसीसीआय सचिव पुढे म्हणाले की, गेल्या वेळी ऑस्ट्रेलियात पिंक बॉल कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून गुलाबी चेंडूने एकही कसोटी सामना खेळला गेला नाही. याबाबत आम्ही इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी बोलत असून, त्याची हळूहळू अंमलबजावणी करू.
ICC Awards : टीम इंडियाकडून वर्ल्डकप हिरावणारा ट्रॅव्हिस हेड ठरला ‘या’ पुरस्काराचा मानकरी…
गुलाबी चेंडूंवर (पिंकबॉल) खेळवल्या जात असलेल्या कसोटी सामन्यांना बीसीसीआयने नकार दिला आहे. मुळातच बीसीसीआय या गुलाबी चेंडूंवर कसोटी सामने खेळण्यासाठी पहिल्या पासूनच तयार नव्हती. त्यातच या चेंडूवर खेळल्या जात असलेले कसोटी सामने 2 ते 3 दिवसांतच संपल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळेच येत्या काळात बीसीसीआय या चेंडूंवर कसोटी सामना खेळण्यास नकारच देइल, असे मत बीसीसीआय सचिव जय शहा यांनी व्यक्त केले आहे.
या प्रकारच्या चेंडूंवर आतापर्यंत भारतीय संघाने केवळ 4 कसोटी सामने खेळले आहेत व हे सर्व सामने पूर्ण पाच दिवसही चालले नाहीत. या चेंडूंमुळे मुळ कसोटी क्रिकेटच्या प्रतिमेलाच धक्का पोहोचत आहे, असे बीसीसीआयने त्यावेळीही आयसीसीच्या बैठकीत सांगितले होते. मात्र, आयोजक देशाने या चार कसोटींसाठी भारतीय संघाला तयार केले होते. मात्र, आता पुढील काळात गुलाबी चेंडूवरील कसोटी सामन्यांना बीसीसीय विरोधच करेल, असेही शहा म्हणाले.
ICC ने ODI World Cup 2024 चं वेळापत्रक केलं जाहीर, टीम इंडिया 20 जानेवारीला खेळणार पहिला सामना…
या चार कसोटी सामन्यांपैकी भारताने 3 सामने जिंकले आहेत तर एक पराभव स्वीकारला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील एक कसोटी गुलाबी चेंडूवर खेळवली जाणार अशी चर्चाही बीसीसीआयने फेटाळली आहे.
त्याच वेळी, जर आपण भारतीय महिला क्रिकेट संघाबद्दल बोललो, तर त्यांनी आतापर्यंत फक्त एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे, जो 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला होता. तो कसोटी सामना अनिर्णित राहिला.