वॅन्डनबर्ग स्पेस फोर्स बेस (अमेरिका) – अमेरिकेने हेरगिरीसाठी एक स्वतंत्र उपग्रह अवकाशात आज प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह कॅलिफोर्नियाच्या सांता बार्बरा काउंटीमधील वॅन्डनबर्ग स्पेस फोर्स बेस येथून दुपारी 3.25 वाजता (स्थानिक वेळेनुसार) प्रक्षेपित करण्यात आला. वेस्ट कोस्टवरून करण्यात आलेले डेल्टा 4 रॉकेटचे हे शेवटचे प्रक्षेपण होते.
डेल्टा 4 हेवी कॉन्फिगरेशन रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. या रॉकेटचे प्रथम प्रक्षेपण डिसेंबर 2004 मध्ये करण्यात आले. डेल्टा रॉकेटचे हे 387 वे उड्डाण होते आणि वॅन्डनबर्ग येथून 95 वे आणि अंतिम प्रक्षेपण होते.
अमेरिकेची नॅशनल रिकॉनिसन्स ऑफिस ही संस्था अमेरिकेचे गुप्तचर उपग्रह विकसित करणे, तयार करणे, प्रक्षेपित करणे आणि त्यांची देखरेख करणे अशी प्रमुख कामे करणारी सरकारी एजन्सी आहे. या उपग्रहांद्वारे मिळणारी माहिती धोरणकर्ते, गुप्तचर समुदाय आणि संरक्षण विभाग यांना प्रदान केली जाते.