इस्रायलचा नवा हेरगिरी उपग्रह

जेरूसलेम : इस्रायलने सोमवारी नवा हेरगिरी उपग्रह सोडला. त्यामुळे त्या देशाच्या लष्करी हेरगिरी करण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. विशेषत: इराणसारख्या प्रबळ शत्रूकडील आण्विक ताकद ही इस्रायलची डोकेदुखी आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी इस्रायल आपल्या टेहळणी क्षमतेत वाढ करत आहे.

ओफेक 16 हा उपग्रह सोमवारी पहाटे अवकाशात सोडण्यात आला. त्यासाठी इस्रायली बनावटीचे शाविट रॉकेटचा वापर करण्यात आला. आधुनिक क्षमतेचे इलेक्‍ट्रो ऑप्टीकल रेकन्सिअन्स सॅटेलाईट असे या उपग्रहाचे वर्णन संरक्षण मंत्रालयाने केले आहे.

“प्रत्येक आघाडीवर अणि प्रत्येक जागी आम्ही इस्रायलच्या क्षमतांची वृध्दी करण्याचा प्रयत्न करत आहोत. यापढेही करत राहू
-बेनी गंटझ्‌ (संरक्षण मंत्री, इस्रायल)

या उपग्रहाकडून एक आठवड्यात प्रतिमा मिळण्यास सुरवात होईल. सरकारी इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने हा उपग्रह बनवला आहे. त्यातील तांत्रिक बाजू संरक्षण संस्था एल्बीट सिस्टिमने सांभाळली अहे.

Leave A Reply

Your email address will not be published.