जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५५ वर पोहचली तर ९४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
सातारा (प्रतिनिधी) – कराड येथील दोन महिला तर सातारा शहरातील २७ वर्षांचा युवक अशा तिघांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता ५५ झाली आहे. विविध विलगीकरण कक्षातील ९४ जणांचे निगेटिव्ह आले आहे.
सातारा जिल्ह्यात कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील २ महिला (वय वर्षे १६ व ३७) व सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील सातारा येथे मुबंईवरून १७ एप्रिल रोजी आलेला तरुण (वय वर्षे २७) घरात विलगीकरणामध्ये होता. सर्दी, खोकला म्हणून काल भरती झाला होता. अशा 3 नागरिकांचा करोना कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते करोनाबाधित असल्याची माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील २०, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ७१, व कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील ३ अशा ९४ संशयितांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात ५५ रुग्ण करोनाबाधित असून त्यापैकी आतापर्यंत ८ (कोविड 19) करोनामुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे.