सांगली (प्रतिनिधी) – शिराळा तालुक्यातील निगडी येथील ३० वर्षीय पुरुष व २४ वर्षीय महिला या दाम्पत्याचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. हे दाम्पत्य दि.14 मे रोजी मुंबईहून आले होते. तथापि, या दोघांना निगडी गावातील लोकांनी गावात न घेतल्याने ते जांभुळवाडी येथील कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये राहत होते.
या दोघांनाही शनिवारी लक्षणे दिसू लागल्याने त्यांचा स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून दोघांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे . या कम्युनिटी क्वारंटाईनमध्ये अन्य तिघे रहात होते .त्यामुळे उर्वरित तिघांनाही आयसोलेशन वॉर्ड मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ . अभिजित चौधरी यांनी दिली.