महिलेच्या गर्भात होता तब्बल 10.5 किलोंचा ट्यूमर

 गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ः 50 वर्षांच्या रुग्णाचा रक्‍तगटही होता दुर्मिळ

पिंपरी – एका 50 वर्षीय महिलेच्या गर्भाशयातील 10.5 किलोचा ट्यूमर काढण्यात चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांना यश आले आहे. गर्भाशयाची शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती. परंतु, डॉक्‍टरांच्या अथक परिश्रमाने रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे स्त्री-रोगतज्ञ व ऑन्कोसर्जन डॉ. निखील परवटे म्हणाले, रुग्ण महिलेचे ओटीपोट वाढत जाऊन जवळपास 39 सेमी इतके झाले होते. मांसाच्या या वाढीव गोळ्याने रुग्ण महिलेच्या प्रजनन अवयवांची रचना पूर्णतः बिघडलेली होती, परंतु, उपचारांनी ती पूर्ववत करण्यात आली. आम्ही रुग्णांचे गर्भाशय, लहान व मोठे आतडे या अवयवांना कोणतीही इजा न पोहोचवता काळजीपूर्वक आतील बाजूलाही छेद दिला. हा मांसाचा गोळा बाहेर काढणे फार कठीण होते. रक्तस्त्राव टाळण्यासाठी आमच्या मार्गात येणारी प्रत्येक लहान रक्‍तवाहिनी आम्ही बांधली. हा गोळा 10.5 किलोचा होता आणि कोणत्याही अवयवाला धक्का न पोहोचवता हे काम करणे हे एक मोठे आव्हान होते.

या मांसाच्या गोळ्यातच 1.5 लीटर रक्‍तअसल्याने आम्ही रुग्ण महिलेला 2 बाटल्या रक्‍त चढवले. तसेच, अधिक रक्‍तस्त्राव होण्याचा अंदाज असल्यामुळे भूलतज्ञ टीमने केंद्रीय लाईनपासून ऑपरेशनच्या आधी आवश्‍यक त्या सर्व प्रक्रिया उत्तम रित्या सांभाळल्या. रुग्ण महिलेचा रक्‍तगटही दुर्मिळ (ए नेगेटिव्ह) होता. परंतु, शस्त्रक्रियेपूर्वीच आदित्या बिर्ला हॉस्पिटलच्या रक्‍तपेढीकडून या गटाच्या रक्‍ताची व्यवस्था करण्यात आली होती. डॉक्‍टरांच्या टीममध्ये गॅस्ट्रो-इण्टेस्टिनल सर्जन डॉ. प्रकाश वळसे, भूलतज्ञ टीममध्ये डॉ. आशिष पाठक, डॉ. रणजित, डॉ. तानाजी आणि रक्‍तपेढी प्रमुख डॉ. रविंद्र सिंग यांचा समावेश होता. या टीमच्या मदतीने केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण महिला चालू लागली, असेही डॉक्‍टरांनी सांगितले. आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.