नवी दिल्ली : आपल्या आवाजने करोडो लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी. गेल्या वर्षी ६ फेब्रुवारीला त्यांनी या जगाचा निरोप घेतला, पण आजही त्या प्रत्येकाच्या हृदयात आहेत. लगा मंगेशकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सॅण्ड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.
ओडिशातील पुरी बीचवर पटनायक यांनी वाळूपासून सुंदर कलाकृती बनवून लता दीदींना अभिवादन केले आहे. पुरी बीचवरील लता मंगेशकर यांचे हे वाळूशिल्प सुमारे 6 फूट उंच आहे. त्यासोबत एक संगीत वाद्यही या ठिकाणी बनवण्यात आले आहे. ‘मेरी आवाज ही पहचान है.. ट्रिब्यूट टू लता जी’ अशा आशयाचा मजकूर देखील यावेळी लिहिण्यात आल्याचे पाहायला मिळते.
लता दीदींना दिलेल्या अनोख्या आदरांजलीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताहेत.अनेक नेटकऱ्यांनी पटनायक यांनी साकारलेल्या या कलाकृतीचे विशेष कौतुक देखील केला आहे. राजकीय,कला- क्रीडा अशा विविध क्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियावरून लता दीदींच्या अनेक आठवणींना उजाळा दिल्याचे पाहायला मिळाले.
On the occasion of the first death anniversary of Lata Mangeshkar, sand artist Sudarsan Pattnaik created a 6ft high sand sculpture with the message ‘Tribute to Bharat Ratna Lata Ji, Meri Awaaaz Hi Pehechan Hai’, at Puri beach in Odisha (05.02) pic.twitter.com/IeqtWTbvPh
— ANI (@ANI) February 6, 2023
गेल्या वर्षी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ६ फेब्रुवारी रोजी दीर्घ आजाराने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांना 2001 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला होता. याशिवाय त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.