मुंबई – आमिर खानचा भाचा म्हणजेच, अभिनेता इम्रान खान पुन्हा एकदा आपल्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. इमरान खान त्याची पत्नी अवंतिका हिच्यापासून विभक्त झाल्यानंतर कलाविश्वातून नाहीसा झाला होता. अभिनेता इम्रान खान याने ‘जाने तू या जाने ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्याच्या पहिल्या सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.
पण त्यानंतर अभिनेत्याला अभिनय क्षेत्रात मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. आणि त्यानंतर तो बॉलिवूड पासून दुरावल्याचं पाहायला मिळालं. इम्रान खान काय करतो, कुठे असते? याची माहिती चाहत्यांना नव्हती. इम्रान सोशल मीडियावर देखील बराच काळ सक्रिय नव्हता. सतत येणारं अपयश आणि घटस्फोटामुळे अभिनेता अनेकदा चर्चेत असायचा. मात्र, आता पुन्हा एकदा अभिनेता इम्रान खान चर्चेत आला आहे. त्याच कारण देखील तितकंच खास आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, यामध्ये इम्रान सोबत एक महिला दिसत आहे. दोघे एकमेकांसोबत हातात हात घालून चाहलताना दिसत आहेत. दरम्यान, ही महिला दुसरी-तिसरी कोणी नसून दाक्षिणात्य अभिनेत्री ‘लेखा वाशिंग्टन’ आहे.
सध्या या दोघांचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर आपली प्रतिक्रया देत आहे. “इम्रान आणि लेखा एकमेकांना डेट करत आहेत का?’ असा प्रश्न चाहते उपस्थित करताना दिसत आहे. दरम्यान, इम्रान आणि लेखाच्या या नात्याबद्दल अद्याप दोघांचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण इम्रानला खूश पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.