मुंबई – गान कोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. मंगेशकर यांचे करोना निदान झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करोनाची सौम्य लक्षणे असून त्यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे.
Legendary singer Lata Mangeshkar admitted to ICU after testing positive for Covid-19. She has mild symptoms: Her niece Rachna confirms to ANI
(file photo) pic.twitter.com/8DR3P0qbIR
— ANI (@ANI) January 11, 2022
देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात करोना रुग्णांची वाढ होत आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते यांच्यासह अनेक सेलिब्रेटी व महत्वाच्या व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसत असल्याचे यावरून दिसून येत आहे. असे असताना लता मंगेशकर यांना सुद्धा करोनाची लागण झाली आहे.