मुंबई – अभिनेता शाहरूख खान यांनी राज्यातील आरोग्य सेवक व डॉक्टरांसाठी 25 हजार सुरक्षा उपकरणे दान दिली आहेत. त्यात पीपीई किट्सचाही समावेश आहे. त्याबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. करोना विरूद्धच्या लढाईत 25 हजार पीपीई किट्सची मदत ही मोलाची आहे त्याचा बराच लाभ होणार आहे.
वैद्यकीय पथकातील सेवकांना त्यापासून मोठेच संरक्षण मिळू शकणार आहे असे टोपे यांनी आपल्या ट्विटर संदेशात नमूद केले आहे. शाहरूख खान आणि त्यांच्या पत्नी गौरी खान यांनी आपले चार मजली खासगी ऑफीसही करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी देऊ केले आहे. या खेरीजही शाहरूख खान यांनी व्यक्तीगत स्वरूपात अनेक प्रकारची मदत या आधीही देऊ केली आहे.