Nagpur rain । मागच्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच काल नागपूरमध्ये दिवसभर नागपूरमध्ये विविध ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. अचानक वातावरण बदलल्याने नागरिकांना उकड्या[पासून दिलासा मिळाला आहे.
नागपुरात गुरुवारी सकाळी अर्धा तास दमदार पाऊस पडला. हवामानशास्त्र विभागाच्या सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नागपुरात 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल सकाळी नागपूरमध्ये निरभ्र आकाश आणि चांगले कडकडीत ऊन होते. मात्र, नऊ वाजता अचानकच वातावरण बदललं आणि यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर जोरदार पाऊस झाला.
गेल्या 58 वर्षातला विक्रमी पाऊस Nagpur rain ।
सकाळी सव्वानऊ वाजल्यापासून सुमारे एक तास नागपुरातील वेगवेगळ्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून खाली उभ्या असलेल्या दुचाकी आणि वाहनांचा नुकसान झाल्याची ही माहिती आहे. दरम्यान हवामान विभागाने येत्या काही तासांमध्ये पुन्हा नागपुरात मुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागपूरमध्ये काल सकाळपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत 50.2 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात गेल्या 58 वर्षातला हा एका दिवसातील सर्वाधिक पाऊस आहे.
भंडाऱ्यात अवकाळी पाऊस Nagpur rain ।
गेल्या तीन दिवसात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अनेकांच्या शेतातील भातपीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांनी धान मळणीसाठी धान कळपा शेतात कापून ठेवलेल्या असताना त्या अवकाळी पावसात सापडल्यानं आता पाण्याखाली आल्या आहेत. यामुळं धानाची नासाडी होण्याची भीती आहे. तर, काही ठिकाणी कापणीला आलेले भात पीक जोरदार वारा आणि पावसात सापडल्यानं जमीनदोस्त झालेलं आहे.