मेष : “”आपले काम बरे की आपण बरे” हे धोरण उपयोगी पडेल. घरात आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग.
वृषभ : चार पैसे जास्तच खर्च होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात टंगळमंगळ करू नये. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.
मिथुन : भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कामे उरका. इतर व्यक्तींच्या विचित्र वागण्याचा मनःस्ताप होईल.
कर्क : घरात अनावश्यक खर्च होतील. व्यवसाय नोकरीत मनातील इच्छा सफल होतील. पत्रव्यवहार होतील.
सिंह : काही महत्त्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल.
कन्या : कल्पकता दाखवून कामे उरकाल. घरात तुमचा उत्साह व आत्मविश्वासाने केलेली कृती कौतुकास पात्र होईल.
तूळ : महिला मोठ्या खुबीने कौटुंबिक प्रश्न मार्गी लावतील. राजकारणी, कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.
वृश्चिक :दैवाची साथ मिळेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन राहील. फायदा मिळवून देणाऱ्या घटना घडतील.
धनू : नोकरीत बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्याल. तुमचे विचार पटवून देण्यात यशस्वी व्हाल. विवाह जमतील.
मकर : महिलांचा खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठीच असेल. आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल.
कुंभ : व्यवसायात योग्य व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना घ्या. नोकरीत मिळालेल्या संधीचे सोने करा.
मीन : वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवा. चित्त स्थिर नसल्याने तळ्यात मळ्यात रहाल. मानसिकतेला जपावे.