नगर -जिल्ह्यात आज नवे 900 करोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच तब्बल 933 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांनी दिली. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 33 हजार 381 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण 87.48 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 900 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4 हजार 146 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 76, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 224 आणि अँटिजेन चाचणीत 600 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 42, पाथर्डी 9, नगर ग्रामीण 1, श्रीरामपूर 2, नेवासा 5, श्रीगोंदा 6, पारनेर 3, राहुरी 3, कोपरगाव 3 आणि इतर जिल्हा 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 224 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 40, संगमनेर 14, राहाता 19, पाथर्डी 6, नगर ग्रामीण 29, श्रीरामपूर 34, नेवासे 11, श्रीगोंदा 2, पारनेर 23, अकोले 3, राहुरी 22, शेवगाव 3, कोपरगाव