पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आणखी तिघे जण करोना बाधित असल्याचा अहवाल शुक्रवारी (दि. ८) सकाळी प्राप्त झाला. यामुळे करोना बाधितांची एकूण संख्या १५४ वर गेली आहे.
ताम्हाणे वस्ती-चिखली आणि मोशी या परिसरात तीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर गुरुवारी (दि. ७) शहरातील सहा आणि शहराबाहेर एक असे एकूण सात करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. करोनामुळे आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी तीन जण पिंपरी चिंचवड शहरातील तर चार जण शहराच्या हद्दीबाहेरील आहेत. तसेच आत्तापर्यंत एकूण ६२ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.