तळेगाव ढमढेरे (वार्ताहर) – येथील एका महिलेचा अहवाल कोरोना बाधित आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिरूर तालुक्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील दहा ते पंधरा गावांसह शिरूर तालुका हादरला आहे. दरम्यान, महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी दिलेल्या माहिती नुसार येथील एका महिलेला रात्रीचा त्रास होऊ लागल्याने गावातीलच खाजगी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर तिला करोना विषाणूची काही लक्षणे दिसुन आल्याने कोरोनाची खाजगी चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली आहे. दरम्यान या महिलेला उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात पाठविण्यात आले होते (दि.७) त्यावेळी हा अवहाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.
हि महिला तळेगावतील दोन खाजगी दवाखान्यात या अगोदर उपचारासाठी गेली असल्याने महिलेच्या कुटुंबातील अकरा व्यक्ती सह खाजगी हॉस्पिटलचे कर्मचारी १४ दिवस होम क्वारंटईन करण्यात आले आले आहेत. तालुक्यात आढळुन आलेल्या करोना बाधित रुग्णाची संख्या आता ५ वर पोहोचली आहे. तळेगावमध्ये करोना रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी सणसवाडी आणि शिक्रापूर या जवळच्या गावामध्ये करोना रुग्ण आढळले असूनही नागरीक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याने या रोगाला एक प्रकारे आमंत्रण दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशी आहे परिसरातील कोरोनाची स्थिती
★ १६ मार्च – पहिला रुग्ण सणसवाडीत आढळला त्याच्या संपर्कातील आलेल्या शिक्रापूर येथील खाजगी दोन हॉस्पिटलच्या डॉक्टरसह १७ जणांना क्वारंटईन
★ १४ एप्रिल – शिक्रापूर मधील एका सोनोग्राफी सेंटरच्या डॉक्टरचा कोरोना चाचणी अहवाल पोसिटीव्ह आल्याने डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या १४४ स्त्री आणि पुरुषांना क्वारंटईन
★ १८ एप्रिल – विठ्ठलवाडी येथील दोन वर्षांच्या मुलीचा खाजगी कोरोना चाचणीचा अहवाल पोसिटीव्ह
★ २३ एप्रिलला शिक्रापूरमधील एका ४० वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्य
★ ७ मे – तळेगाव ढमढेरे येथील एका महिलेचा खाजगी अहवाल कोरोना बाधित.
नागरिकांनी घाबरून न जाता संपूर्ण लॉकडाऊनचे पालन करा, अनावश्यक गर्दी करू नका, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी थुंकू नका, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, अनाआवश्यक घराबाहेर पडू नका.
प्रज्ञा घोरपडे, वैद्यकीय अधिकारी, तळेगाव ढमढेरे.