मुंबई – राज्यातील राजकारणाने एका रात्रीत अचानक सर्व चित्र बदलले आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेत येईल असे वाटत असतानाच आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर रोहित पवार यांनी शरद पवार यांचा ट्विला रिट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही.
हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 23, 2019
रोहित पवार यांनी ट्विट केले आहे की,’अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.’ दरम्यान, अजित पवार यांचा हा निर्णय वैयक्तिक असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा या निर्णयाला पाठिंबा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे राज्यात घडलेल्या या घडामोडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध असल्याचे दिसून येत आहे.