त्यांनी तरुणांची माथी भडकावली; आम्ही रोजगार दिला : आ. जगताप  

नगर  – त्यांनी 25 वर्षे नगर शहरात जातीच्या धर्माच्या नावावर राजकारण करीत दोन समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली. तरुण वर्गाची माथी भडकावून त्यांना देशोधडीला लावले तर आम्ही तरुणांना योग्य मार्गदर्शन करीत त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला. असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आ. जगताप यांनी मुकुंदनगर परिसरात तसेच सर्जेपुरा भागात प्रचारफेरी काढली. प्रभाग 6 मध्ये आयोजित संवाद मेळाव्यात नागरिकांशी संवाद साधला. आ. जगताप म्हणाले, नगर शहराच्या विकासाबरोबरच तरुणवर्गाला चांगली दिशा देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण विकासाचे व्हिजन घेऊन नागरिकांसमोर जात आहोत.

शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत सर्व नागरिकांनी कुठल्याही अपप्रचाराला, भुलथापांना बळी न पडता विकासाला साथ द्यावी व शहराचा कायापालट करण्यासाठी आपणास पुन्हा एकदा विधानसभेत पाठवावे असे आवाहन त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.