पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जॉयफुल सुंदरकांड ग्रुप पुणे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग वैदिक धर्म संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हनुमान जन्मोत्सव गंगाधाम चौक येथील वर्धमान सांस्कृतिक भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ आंतरराष्ट्रीय शिक्षक, काशी भैय्या या नावाने ओळखले जाणारे दिनेश काशीकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी सुमारे पाच हजार जणांनी २१ लाख जय श्री रामचा जप केला, तसेच सुंदरकांड पाठ आणि हनुमान चालिसाचे पठण केले. मिनू पोद्दार आणि श्री संजय पारख यांच्या नेतृत्वाखाली याचे आयोजन केले होते.
श्री दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने सूर्य सह्याद्री हॉस्पिटलने सर्व भक्तांसाठी मोफत वैद्यकीय तपासणीची तरतूद करण्यात आली होती. सुनील पोद्दार, महेश सलुजा, सतीश अग्रवाल, संदीप अग्रवाल आणि हसमुख लिंबाचिया यांच्यासह कोअर कमिटीने सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले.