मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन पॉडकास्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत घेण्यात आली आहे. ही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत येत्या २६ आणि २७ जुलै रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. याच मुलाखतीचा प्रसारित करण्यात आला आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे या मुलाखतीत त्यांचे राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट, अजित पवार यांचा शपथविधी, महाविकास आघाडीचं भवितव्य तसेच काँग्रेससोबत जात ‘इंडीया’ आघाडीत घेतलेला सहभाग या सर्व मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत २६ आणि २७ जुलै रोजी दोन भागात प्रसिद्ध होणार आहे.
या टिझरमध्ये आवाज कुणाचा, वर्षातील सर्वात मोठा, स्फोटक आणि थेट भाग लवकरचं अशी अक्षरं आणि उद्धव ठाकरे, संजय राऊतांचा एकमेकांसमोर बसलेला फोटो या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. “महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज, ‘आवाज कुणाचा’ वर! लवकरच….” असेही या टीझरच्या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे.
‘आवाज कुणाचा’ अशा नावाने उद्धव ठाकरे गटाकडून पॉडकास्ट सुरू करण्यात आलं आहे.शिवसेनेची अधिकृत भूमिका आणि विविध राजकीय विषयांवर चर्चांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जाणार आहे. पहिल्याच भागता उद्धव ठाकरे यांची मुलाखत संजय राऊत यांनी घेतली आहे. विशेषतः तरुणांमध्ये सध्या पॉडकास्ट हा प्रकार लोकप्रिय असल्यानं याच्या माध्यामातून तरुण वर्गाला अधिक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.