वाघोलीत उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
आठशे विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकाचे वाटप
वाघोली – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योग धंद्यात प्रगती साधून आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन जनसेवक संपत आबा गाडे यांनी केले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली येथील भारतीय जैन संघटना शाळेतील विद्यार्थ्यांना मी श्रीमंत होणारच या पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गाडे बोलत होते. विद्यार्थी जीवनात ध्येय निश्चित करून त्या ध्येयाप्रती प्रयत्नाद्वारे पोहोचण्यासाठी जिद्द आणि मेहनतीची आवश्यकता असते या जिद्दीतूनच नेत्रदीपक यश निर्माण होते यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन करावे असे आवाहन प्रसिद्ध लेखक व व्याख्याते डॉ. उमेश कणकवलीकर यांनी केले.
वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालय येथे शिकणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना तसेच अनाथ व ग्रामीण भागातील ८०० विद्यार्थ्यांना मी श्रीमंत होणारच हे प्रेरणादायक पुस्तक मोफत वितरित करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते,लेखक उमेश कणकवलीकर सर, विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी,पी. आर. पवार सर ज्ञानेश्वर पठारे, नवनाथ गाडे, निखिल गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.