वॉशिंग्टन – रशियाबरोबर भारताने जसे संबंध निर्माण केले आहेत, तसे अमेरिकेला पूर्वी चांगले संबंध निर्माण करता आले नाहीत, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. भारताने रशियाबरोबर सध्या गरजेपेक्षा जास्त भागीदारीचे संबंध निर्माण केले आहेत. तसे भागीदारीचे संबंध निर्माण करणे अमेरिकेला पूर्वी शक्य नव्हते, असे ब्लिंकेन म्हणाले. भारत आणि रशियाचे संबंध दशकभरापूर्वीपासूनचे आहेत. भारतासाठी रशिया हा पर्याय असलेला अनावश्यक भागीदार होता. मात्र अमेरिकेच्या बाबत तसे नव्हते, असे ब्लिंकेन म्हणाले.
आता अमेरिका त्या दृष्टीने गुंतवणूक करत आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान संरणात्मक संबंधांचे अभिसरण वाढते आहे, असेही ते म्हणाले. अमेरिकेच्या संसदेतील एका उपसमितीतील वार्तालापाच्या कार्यक्रमात ते संसद सदस्यांशी बोलत होते. भारताबरोबर अमेरिकेचे दीर्घकालीन संरक्षण भागीदारीचे संबंध आहेत. 21 व्या शतकात या संबंधांमधून अधिक चांगली फलनिष्पत्ती होऊ शकेल, अशी आशा एक संसद सदस्या विल्यम हॅगर्टी यांनीही व्यक्त केली. त्यावर या मतांशी आपण बहुतांशी सहमत आहोत, असे मत ब्लिंकेन यांनीही व्यक्त केले.