जगात सर्वत्रच प्लास्टिक सर्जरीचा ट्रेंड वाढला

दरवर्षी एक कोटी लोक करतात प्लास्टिक सर्जरी भारतीयांचे प्रमाण साडेतीन टक्के

वॉशिंग्टन – गेल्या काही वर्षांमध्ये जगात सर्वत्र प्लास्टिक सर्जरी करून घेण्याचे प्रमाण वाढले असून दरवर्षी एक कोटी पेक्षा जास्त लोक प्लास्टिक सर्जरी करून घेतात यामध्ये भारतीयांचे प्रमाण साडेतीन टक्के आहे प्लास्टिक सर्जरी करून घेणाऱ्या देशांमध्ये ब्राझीलचा क्रमांक अव्वल आहे.

करोना महामारी सुरू होण्यापूर्वी 2019 मध्ये 2018 च्या तुलनेमध्ये सात टक्के जास्त प्लास्टिक सर्जरी झाल्या सरासरी एक कोटी 13 लाख लोक दरवर्षी प्लास्टिक सर्जरी करत असल्याचे समोर आले आहे.

याशिवाय प्लास्टिक सर्जरी न करता या प्रकारची थेरपी करणाऱ्यांचे प्रमाण एक कोटी 36 लाख आहे प्लास्टिक सर्जरी करून घेणाऱ्या देशांमध्ये ब्राझीलचा क्रमांक पहिला असून भारत पाचव्या स्थानावर आहे दरवर्षी प्लास्टिक सर्जरी करून घेणाऱ्या लोकांमध्ये साडेतीन टक्के लोक भारतीय असतात.

प्लास्टिक सर्जरीचा हा बाजार 4.8 चा लाख कोटी रुपयांचा आहे येत्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये हा बाजार 5 लाख कोटी रुपयांचा टप्पा पूर्ण करेल असे संकेत मिळत आहेत ब्राझीलच्या पाठोपाठ अमेरिका मेक्सिको आणि रशिया या देशातील नागरिक प्लास्टिक सर्जरी करून घेणाऱ्यामध्ये आघाडीवर आहेत सर्जरीचा आधार घेऊन आपले सौंदर्य वाढण्यामध्ये महिलांचा पुढाकार जास्त आहे.

स्तनांचा आकार व्यवस्थित करण्यासाठी आणि स्तन सुडौल दिसण्यासाठी प्रामुख्याने प्लास्टिक सर्जरी चा आधार घेतला जात आहे त्या व्यतिरिक्त ओठांचा आकार आकर्षक करण्यसाठीही प्लास्टिक सर्जरी केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.