मुंबई – करोनाच्या महासंकटानंतर अनेकजण बेरोजगार झाले आहेत. सर्वसामान्यांना आर्थिक अडचणींचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्यातच घरगुती गॅसच्या किंमती दर वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
Get up to ₹900 cashback while booking your #Indane LPG refill on @Paytm. Book now: https://t.co/4xn4H7wD7R. Terms & Conditions Apply. #LPGBooking pic.twitter.com/gFOsDcnWym
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) July 20, 2021
यातच जुलै महिन्याच्या सुरुवातीला विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत 84 रुपयांनी वाढली आहे. मात्र, पेटीएम कंपनीने एक खास ऑफर सादर केली आहे. पेटीएमद्वारे बुकिंग केल्यास ग्राहकांना ९00 रूपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. हा कॅशबॅक पहिल्यांदाच पेटीएमद्वारे गॅस सिलिंडर बुक करणाऱ्यांना दिला जाणार आहे
PayTm वरून सिलिंडर कसा बुक करावा?
-
सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
-
लॉगिन केल्यानंतर Book a Cylinder या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
-
तुम्ही थेट सर्च ऑप्शनवर जाऊन त्यात Recharge And Bill Pay या ऑप्शनवर क्लिक करू शकता.
-
यामध्ये तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस असे तीन पर्याय मिळतात. त्यात तुम्ही गॅस सिलिंडर प्रोव्हायडरवर क्लिक करा.
-
गॅस प्रोव्हायडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा LPG ID क्रमांक टाकावा लागेल.
-
यानंतर पुढील प्रोसेस फॉलो करुन तुम्ही सिलिंडर बुक करू शकता.