dasara melava updates – मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी शिंदे गटाकडून स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत, आपला गट हाच खरी शिवसेना असून परवानगी आपल्यालाच मिळावी अशी मागणी केलेली. उच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली असून उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंना परवानगी दिल्यानंतर शिंदे गटाची पुढील रणनीती ठरली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याच शिंदे गटाच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे.
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
उच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिंदे गटाला मोठा धक्का
तत्पूर्वी, दसरा मेळाव्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अशातच आज मुंबई उच्च न्यायालयाने आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मानणाऱ्या शिवसेनेतील दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितलेली. मात्र मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत दोन्ही गटांना शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी नाकारली होती. dasara melava updates
महापालिकेच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, यावर आज सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उद्धव ठाकरेंकडून स्वागत
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. शिंदे गटाने दसरा मेळाव्व्यावर दावा केल्याने उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा संघर्ष पेटला होता. मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना दादरच्या शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी नाकारल्याने हा वाद न्यायालयाच्या दारात गेला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आज याबाबत निर्णय देताना उद्धव ठाकरे गटाला मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले निवासस्थान मातोश्रीबाहेर येत उपस्थित शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकायवाचं आहे, विजयाच्या तयारीला लागा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. dasara melava updates
शिवसैनिकांचा जल्लोष!
मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला येत्या ५ सप्टेंबरला होणार दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने दसरा मेळाव्यावर दावा सांगितल्याने ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगला होता. न्यायालयाचा निर्णय ठाकरे यांच्या बाजूने लागल्याने त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर येत जल्लोष केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना भवन परिसरात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करत पेढे वाटले. पुण्यात देखील शिवसैनिकांनी या निर्णयाचे स्वागत करताना जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना नेते अनिल परब, विनायक राऊत, किशोरी पेडणेकर, या नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. dasara melava updates