घिरट्या घालणाऱ्यांना जनता धडा शिकवेल : आ. पाटील

शासनावर सडकून टीका; काहींना जनतेचा बेगडी कैवार 

वाई – गेली दहा वर्षे विकासकामे व जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करत आलो आहे; परंतु निवडणुका आल्या की काही जण जनतेचा बेगडी कैवार घेतात. निवडणूक काळात घिरट्या घालणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असा इशारा आ. मकरंद पाटील यांनी दिला. युती शासनावरही त्यांनी सडकून टीका केली.

लोहारे, ता. वाई येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन, भूमिपूजन झाल्यानंतर शेंदुरजणे गणातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप, प्रमोद शिंदे, शशिकांत पवार, शंकरराव शिंदे, शिवाजीराव पिसाळ, विक्रांत डोंगरे, मदन भोसले, लक्ष्मणराव पिसाळ, दीपक बाबर, अतुल जाधव, प्रकाश शिंदे, राजाबापू गाढवे, जयसिंग जगताप, विजयसिंह पिसाळ, मनीष भंडारे, अरविंद कुदळे,विलास मांढरे, राजेंद्र सोनावणे, अंकुश कुंभार, बापूसाहेब जमदाडे, संतोष कळंबे, चंद्रकांत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पाटील म्हणाले, तालुक्‍यात विकासाच्या परंपरेचा इतिहास लोहारे गावाने लिहिला आहे. लोहारे व बोपर्डी येथे 11 कोटी 79 लाख रुपये खर्चाच्या लघुपाटबंधारे तलावाला मंजुरी मिळाली आहे. बोपर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वन विभागाकडून जागा हस्तांतरीत करून दोन कोटी 65 लाखांचा निधीही वर्ग करण्यात आला आहे.

गेली 15 वर्षे सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. भाजप व शिवसेना ज्या पद्धतीने नव्यांना पक्षात प्रवेश देत आहेत, त्यांचे पोट या निवडणुकीत फुटल्याशिवाय राहणार नाही.
सर्जेराव जाधव, प्रतापराव पवार, महादेव मसकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. मोहनराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. सरपंच सौ. मनीषा गुरव, विलास सावंत, अशोक सावंत, शीतल सावंत, विजय भिलारे, हणमंत सावंत, उल्का संकपाळ, साहेबराव ढेकाणे, राजेंद्र भिलारे, दीपक संकपाळ, हणमंत बाबर, नवनाथ शिंदे, युवराज पोळ, तुषार भिलारे यांनी स्वागत केले. बाळासाहेब भिलारे यांनी आभार मानले. यावेळी रमेश गायकवाड, नामदेव हिरवे, दामोदर फणसे, शंकर मांढरे,मधुकर चौधरी, संतोष बाबर, अनिल पोळ, धर्माजी घाडगे, मनोहर मांढरे, लालासाहेब ओंबळे, ज्ञानेश्‍वर मांढरे, धर्मराज शेलार, बाळासाहेब मांढरे, आप्पासाहेब ढेबे, यशवंत मांढरे, सतीश मांढरे उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)