नगर -जिल्ह्यात आज 724 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 39 हजार 562 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.05 टक्के इतके झाले आहे. तसेच 405 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सध्या 4 हजार 142 रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहावाजेपर्यंत 405 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये महापालिका क्षेत्रातील 5, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 207 आणि अँटिजेन चाचणीत 193 रुग्ण बाधित आढळले. खाजगी
प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 207 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 71, अकोले 3, जामखेड 2, कोपरगाव 4, नगर ग्रामीण 13, नेवासे 6, पारनेर 11, पाथर्डी 3, राहाता 23, राहुरी 32, संगमनेर 17, शेवगाव 4, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 17, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 193 जण बाधित आढळून आले. यामध्ये कोपरगाव 20, नगर ग्रामीण 16, नेवासे 24, पाथर्डी 24, राहाता 36, राहुरी 19, संगमनेर 32, श्रीगोंदा 21, कॅन्टोन्मेंट 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज 724 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 160, अकोले 37, जामखेड 42, कर्जत 19, कोपरगाव 24, नगर ग्रामीण 42, नेवासे 36, पारनेर 29, पाथर्डी 30, राहाता 68, राहुरी 43, संगमनेर 51, शेवगाव 43, श्रीगोंदा 39, श्रीरामपूर 55, कॅन्टोन्मेंट 2, मिलिटरी हॉस्पिटल 3, इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.