हाथरस येथील दुष्कृत्य मानवतेला कलंक : अण्णा हजारे

पारनेर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील दुष्कृत्य मानवतेला कलंक फासणारी आहे आहे, असे सांगत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली. ही घटना म्हणजे केवळ मुलीची नाही तर मानवतेचे हत्या आहे.

भारत ऋषीमुनींचा देश म्हणून ओळखला जातो. भारताची संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे आणि अशा देशात होणारे दुष्कृत्य हे मान खाली घालायला लावणारे आहे. ही घटना चिंताजनक आहे.कायदा व सुव्यवस्था सांभाळणारेच कमी पडत असल्याची खंत हजारे  यांनी पत्रकात व्यक्‍त केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.