नगर – नगर जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता तब्बल दोन हजार 620 वर पोचली आहे. आज एकाच दिवसात पुन्हा 300 नवीन रुग्णांची त्यात भर पडली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे आज दुपारी घोषित करण्यात आलेल्या बुलेटीनमधून ही माहिती देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आज संगमनेर 25, नगर तालुका 22, नगर शहर 13, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 3 तसेच पारनेर व राहुरी 1, अकोले व कर्जत प्रत्येकी 2, असा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
दरम्यान, आता वाढती संख्या पाहून नागरिकांचीही भीतीनेच गाळण उडत आहे. दुसरीकडे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. सध्या तब्बल 925 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत
डॉ. विखेंचे “ते’ भाकीत खरे ठरतेय..!
मागील आठवड्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील आठवड्यात तांडव पाहावे लागेल, असे भाकीत केले होते. राजकीय नेता म्हणून नव्हे, तर डॉक्टर म्हणून ही माहिती देत असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्यामुळे आता विखे पाटील यांनी भाकीत केल्याप्रमाणे करोनाबाधितांची संख्या चिंताजनकस्थितीत वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दररोज शंभरी पार करीत आहे.