पाटणा – बिहारच्या बांका येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. सासू आणि जावयाचे प्रेम उघडकीस आल्यानंतर सासऱ्यानेच त्यांचे गावासमोर लग्न लावून दिले. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वृत्तानुसार, सिकंदर यादव (45) असे जावयाचे नाव आहे तर गीता देवी (55) असे सासूचे नाव आहे. जावई आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सासुरवाडीत राहण्यासाठी गेला होता. तिथे त्याचे सासू गीता देवी यांच्यावर प्रेम जडले. काही दिवसांनी ही बाब त्यांचे सासरे दिलेश्वर दर्वे यांना समजली. एक दिवस सासू व जावयाला रंगेहात पकडले.
बिहार, में सास-दामाद ने गांव वालों के सामने रचाई शादी, दामाद और सास का कई सालों से चल रहा था अफेयर, अब यही देखना रह गया था #AbkiBaar400Paar #Election2024 #GTvsRCB #TakeItLightly #viralvideo #LokSabhaPolls #TejRanFam #INFOSYS pic.twitter.com/YGKl7P8pQj
— Priya halchal (@HalchalPriya) April 28, 2024
त्यानंतर त्यांनी ही बाब गावच्या पंचायतीपुढे मांडली. जावई सिकंदरने आपले सासूवर जिवापाड प्रेम असल्याचे सांगिले. त्यानंतर सासू गीता देवी यांनीही त्या वक्तव्याला दुजोरा दिला. सिकंदरवर प्रेम असल्याचे सांगितले. अखेर सासरे दिलेश्वर दर्वे यांनी समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत या दोघांचे लग्न लावून दिले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात सिकंदर गीता देवी यांच्या कपाळाला कुंकू लावताना दिसून येत आहे.