T20 World Cup 2024 (Afghanistan Cricket Team Squad) : अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. रशीद खान टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय मोहम्मद नबी आणि रहमानउल्ला गुरबाज या खेळाडूंना स्थान मिळाले आहे. या संघात रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झदरन आणि मोहम्मद इशाक हे फलंदाज असतील. याशिवाय मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, राशिद खान हे अष्टपैलू खेळाडू आहेत.
या खेळाडूंसह अफगाणिस्तान टी-20 विश्वचषकात करणार प्रवेश …
रशीद खान व्यतिरिक्त टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानच्या गोलंदाजीची जबाबदारी नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक सांभाळतील. याशिवाय सादिक अटल, हजरतुल्ला झाझई आणि सलीम साफी यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे.
🚨 SQUAD ANNOUNCEMENT!🚨
Here’s AfghanAtalan’s Squad for the ICC Men’s T20I World Cup 2024. 🤩#AfghanAtalan | #T20WorldCup pic.twitter.com/M7oTF8ZPaa
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) April 30, 2024
टी-20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघ – रहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झदरन, अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल हक, फजलहक फारुकी आणि फरीद अहमद मलिक
राखीव खेळाडू – सेदिक अटल, हजरतुल्ला झाझई आणि सलीम साफी
येत्या 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. अफगाणिस्तानपूर्वी भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या संघांनी या स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख 1 मे आहे. सध्या ऑस्ट्रेलियासह अनेक देशांना संघाची घोषणा करायची आहे.