करोनामुक्‍तांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर

मुंबई – राज्यात आज 3340 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.15 टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या 1 लाख 40 हजार 325 झाली आहे. दरम्यान, आज करोनाच्या 7827 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 3 हजार 516 रुग्णांवर (ऍक्‍टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 13,17,895 नमुन्यांपैकी 2,54,427 नमुने पॉझिटिव्ह (19.3 टक्के) आले आहेत. राज्यात 6,86,150 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 47,801 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 173 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.4 टक्के एवढा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.