राज्यात दिवाळीपुर्वीच नवे सरकार सत्तेवर येणार

एकाच टप्प्यात 288 जागांवर होणार मतदान

नवी दिल्ली : महाराष्ट्रात निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता अखेर आज संपुष्टात आली. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रासह हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात एकाच टप्प्यात 288 जागांवर निवडणूक होणार असून 21 ऑक्‍टोबरला मतदान तर 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयुक्तांच्या घोषणेनंतर दोन्ही राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

दिवाळीपूर्वीच राज्यात नवे सरकार सत्तेवर येणार आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार नसल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यत्वासह खासदारकीचा राजीनामा दिल्याने विधानसभा निवडणुकीसह सातारा येथे पोटनिवडणूक होईल अशी शक्‍यता वर्तवण्यात आली होती. महाराष्ट्रातील 288 जागांसह हरियाणातील 90 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा सुनील अरोरा यांनी केली. दरम्यान, राज्यात 8.94 कोटी मतदारांची नोंदणी झाली तर 1.8 लाख ईव्हीएम मशीन्सचा या निवडणुकीत वापर करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण निवडणुकीत प्लास्टीकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.