Pune Accident News: पुण्यातील एम.जी. रोडजवळ सात ते आठ वाहनांचा अपघात झाला. अपघातामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला असून गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, एक चारचाकी पुण्यातील एमजी रोड जवळील एका रस्त्यावरून जात होती. गाडी चालवत असताना त्या चालकाला अचानक फिट आली आणि त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे समोर असलेल्या ७ ते ८ दुचाकी गाड्यांना धडक बसली. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
दरम्यान, अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कार चालकाला ताब्यात घेतले आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.