लुसान : भारतीय हाॅकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याला आंतरराष्ट्रीय हाॅकी महासंघाचा सर्वोत्तम पुरूष हाॅकीपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकवणारा मनप्रीत हा पहिलाच भारतीय हाॅकीपटू ठरला आहे.
Congratulations to 2019 FIH Player of the year (Men) – @manpreetpawar07
Vote results:
Manpreet Singh (IND) -35.2% of combined votes
Arthur Van Doren (BEL) -19.7% of combined votes
Lucas Vila (ARG) -11.7 % of combined votesBreakdown: https://t.co/xmsM0jS82C#HockeyStarsAwards pic.twitter.com/Zvq3TiPzcg
— International Hockey Federation (@FIH_Hockey) February 13, 2020
भारताला टोकियो आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देताना कर्णधार म्हणून मनप्रीतने अत्यंत महत्वाची कामगिरी केली होती. या पुरस्कारांच्या शर्यतीत असलेल्या बेल्जियमचा आर्थर वॅन डोरेन आणि अर्जेटिनाचा लुकास व्हिया यांच्यावर मनप्रीतने मात केली.
वॅन डोरेनला दुस-या तर व्हियाला तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मनप्रीतला एकूण ३५.२ टक्के मते मिळाली.