नवी दिल्ली : केरला ब्लास्टर्सने पिछाडीनंतर बार्थोलोमेव ओग्बेचे यांच्या दोन गोलच्या जोरावर शानदार पुनरागमन करत इंडियन सुपर लीग फुटबाॅल स्पर्धेच्या सामन्यात शनिवारी बेंगळुरू एफसी संघाचा २-१ ने पराभव करत विजय नोंदविला.
STOP THE PRESS 🚫@KeralaBlasters have beaten @bengalurufc for the first time ever in #HeroISL history. ✅#KBFCBFC #LetsFootball pic.twitter.com/kYYN8UCI18
— Indian Super League (@IndSuperLeague) February 15, 2020
जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात डेशहोर्न ब्राउनने १६ व्या मिनिटाला गोल करत बेंगळुरू संघास १-० ने आघाडीवर नेले होते, पण त्यानंतर ओग्बेचेने (४५+२) आणि ७२ व्या मिनिटाला गोल करत संघास विजय मिळवून दिला.
बेंगळुरू एफसी संघाने याआधीच प्लेआफमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. तर, केरला ब्लास्टर्स संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.