‘आता फक्त 39 दिवसच राहिले आहेत’ म्हणत काँग्रेस नेत्याचा भाजपला चिमटा

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सन 2020 पर्यंत भारत महासत्ता होईल अशा वल्गना भाजप नेत्यांकडून अनेक वेळा केल्या गेल्या होत्या. सन 2020 संपायला आता केवळ 39 दिवसच राहिले आहेत असा चिमटा कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी भाजपला काढला आहे.

देश विकून महासत्ता होता येत नाही असेही त्यांनी ट्‌विटवर नमूद केले आहे. मोदींच्या सरकारने देशातील अनेक महत्वाच्या सरकारी कंपन्या, रेल्वे आणि विमानतळे विकायला काढली आहेत. त्यातील अनेक विमानतळे विकूनही झाली आहेत.


भारत पेट्रोलियम सारखी नफ्यात चालणारी सरकारी तेल कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली आहे या पार्श्‍वभूमीवर जगताप यांनी देश विकून महासत्ता होता येत नसल्याचे म्हटले आहे.भाई जगताप यांनी करोनाच्या जाहीरातींचा संदर्भ देतही मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

जो पर्यंत लस नाही, तो पर्यंत दुर्लक्ष नको, सतत हात धुवत राहा कधी नोकरपासून, कधी पगारापासून, कधी निवृत्ती वेतनापासून तर कधी व्यवसायापासून ! असा उपरोधिक संदेश ट्‌विटरद्वारे प्रसारीत करून त्यांनी मोदी सरकारच्या सध्याच्या कारभारावर निशाणा साधला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.