पोंदेवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा

पावणेपाच लाखांचे साहित्य जप्त ः 24 जणांवर गुन्हा दाखल

मंचर (पुणे) -आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मंचर पोलिसांनी छापा टाकला. यात 4 लाख 79 हजार 530 रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात 24 जणांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात काही प्रतिष्ठित नागरिक जुगार खेळताना मिळून आले.

 

पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये पोलीस जवान विक्रमसिंह तापकीर, संदीप वारे, निलेश सुपेकर हे शनिवारी (दि. 21) सायंकाळी पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक पद्‌माकर घनवट यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली. पोंदेवाडी गावच्या हद्दीत डिंभे उजव्या कालव्याच्या दक्षिणेस पांदीचा खोचा येथे संतोष दौंड यांच्या शेतात सार्वजनिक ठिकाणी काहीजण तीन पानी नावाचा जुगार खेळत आहे. त्यानुसार मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे, उपनिरीक्षक सागर खबाले, जवान निलेश खैरे, अजित मडके, सोमनाथ वाफगांवकर, संदेश काळडोके, सुदर्शन माताडे, मंगेश लोखंडे या ठिकाणी गेले असता तेथे काहीजण गोलकार बसून जुगार खेळत असताना दिसले. पोलिसांची चाहूल लागताच सर्वजण पैसे आणि पत्ते खाली टाकून पळू लागले; परंतु पोलिसांनी त्यांना जागीच पकडले.

 

या ठिकाणी 59 हजार 190 रुपये रोख रक्कम, 340 रुपये किंमतीचे पत्त्याचे किट, 2 लाख रुपये किंमतीची इरटीगा गाडी (एमएच 14 जेई 3460), 50 हजार रुपये किंमतीची झेन गाडी (एमएच 43 एल 2018), 15 हजार रुपये किंमतीची हिरो एक्‍सट्रीम मोटारसायकल, 15 हजार रुपये किंमतीची शाइन मोटारसायकल (एमएच 14 डीएस 6617), 15 हजार रुपये किंमतीची स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच 14 डीएन 8608), 15 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा एसएस मोटारसायकल (एमएच 14 झेड 0378), 15 रुपये किंमतीची शाइन मोटारसायकल (एमएच 14 एफएच 3945), 15 हजार रुपये किंमतीची पॅशन मोटारसायकल (एमएच 14 एचजे 7215), 15 हजार रुपये किंमतीची पॅशन मोटारसायकल (एमएच 19 एसी 1073), 15 रुपये किंमतीची मोटारसायकल (एमएच 12 एएस 2702), 15 हजार रुपये किंमतीची बजाज सिटी100 मोटारसायकल (एमएच 12 सीएक्‍स 7892), 15 हजार रुपये किंमतीची बजाज डिस्कव्हर मोटारसायकल (एमएच 14 सीव्ही 7898), 15 हजार रुपये किंमतीची शाइन मोटारसायकल (एमएच 12 एसएस 9278), 5 हजार रुपये किंमतीची टिव्हीएस लुना मोटारसायकल (एमएच 14 एनक्‍यू 3814) असा एकुण 4 लाख 79 हजार 530 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस जवान दीपक साबळे यांनी महाराष्ट जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत संबंधितांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस जवान निलेश खैरे करीत आहेत.

 

  • यांना घेतले ताब्यात
    विनायक हारके (वय 32, रा. पोंदेवाडी), रुपेश इंदोरे (वय 37, रा. अवसरी खुर्द), बाबु उर्फ सचिन करंडे (वय 30, रा. भोकरवाडी), विशाल जाधव (वय 26), सतिश रणपिसे (वय 35), सोमनाथ गायकवाड (वय 32), आदीनाथ गायकवाड (वय 34), मनोहर दौंड (वय 33), रमेश बांगर (वय 34, सर्व रा. पोंदेवाडी), विजय चव्हाण (वय 37), दत्तात्रय धरम (वय 62, दोघे रा. शिंगवे), म्हातारबा कापडी (वय 60, रा. जारकरवाडी), जयसिंग इचके (वय 55, रा. गणेशनगर, कवठेयमाई), विकास गुळवे (वय 32, रा. मांजरवाडी), बाळु पवार (वय 54, रा. कवठे येमाई), विलास बागडे (वय 50, रा. पारगांव कारखाना), नवनाथ थोरात (वय 43, रा. मंचर), सावकार भोर (वय 39, रा. कवठे येमाई), विकास पवार (वय 32, रा. कवठे येमाई), सुरेंद्र इंदोरे (वय 34, रा. अवसरी खुर्द), महादु टाव्हरे (वय 72, रा. निरगुडसर), शांताराम कापडी (वय 63, रा. पारगांव), नामदेव जाधव (वय 51, रा. पोंदेवाडी) यांना ताब्यात घेतजले असून किसन टाव्हरे (रा. लाखणगाव) हा पळून गेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.